Bhetala Vitthal! Bhetala Vitthal! My Encounter With God On That Day

5/5 - (2 votes)
Bhetala Vitthal! My Encounter With God On That Day

Bhetala Vitthal! Yes, I met Lord Vitthal. Does anyone have a real encounter with God? Even if not in physical form, in any form! I met Vitthal.

हा लेख मराठीत वाचण्यासाठी कृपया खाली स्क्रोल करा

On the occasion of Aashaadhi Ekadashi, I will share Bhetala Vitthal! My Encounter With God On That Day many years ago.

Introduction

My native is Dharwad. I was studying in college then. I had a three-day holiday, and my brother told me to go somewhere. Then we decided to go on a pilgrimage for two days.  Me, my brother, sister-in-law, and two little nieces decided to go to Idgunji, Murudeshwar, Gokarna, Udupi, Dharmasthala, Honnadu and Sringeri.

We hired a car. My brother’s friend suggested staying in Dharmasthala at one of the guruji’s home. And shared their phone number. In Dharmasthala it takes a long time to visit the shrine. So, we called Guruji and told him about our arrival and the night stay at his place. Guruji readily agreed and promised to make arrangements for a quick Darshan at Manjunath Temple.

We left early in the morning. We went to Murudeshwar after having a darshan of Shri Ganapati in Idgunji. In Murudeshwar we had a good darshan and prasad. Then we went to Gokarna and came to Udupi.

It was seven o’clock in the evening and it was Ekadashi on that day. We had no idea that there was a huge crowd for darshan. It took two hours for us to have Darshan in Udupi. It was already 9.15 pm and we were hungry. There was no prasad in the temple as it was Ekadashi on that day.

On the way to Dharmasthala

Our driver said, it would be too late to reach Dharmasthala if we spend time in having dinner, let’s have the dinner at Dharmasthala. So, we had some fruits and snacks. And continued our journey towards Dharmasthala. Both my nieces were asleep. It had been about half an hour, it started raining heavily. As the road to Dharmasthala was a ghat section driver drove the car very slowly. It was 11 p.m. when we reached. The temple’s prasad time had ended, and not a single hotel was open. We wandered here and there in search of food and decided to go to Guruji’s house.

Stuck in an unknown Place

Meanwhile, my brother was calling Guruji on his landline continuously but the phone was out of order. There was no use of mobile phones like these days. So, we asked random persons to reach Guruji’s house. After 15 minutes we reached a place. It was completely dark, we did not know the road ahead. There was not a single person to ask the route. Then my brother suggested to the driver let’s go to the Dharmasthala bus stand, there will be light and maybe shops or hotels will be open. At least we have something to eat.

It was our testing time, the car stopped working suddenly. By the time my nieces were awake and started crying in hunger. We were hungry too. All the snacks and water we brought were over. The car’s battery had also been discharged. We could see nothing but darkness.

A helping hand in a bad situation

Bhetala Vitthal! Bhetala Vitthal! My Encounter With God On That Day

The situation was too scary. Then our driver suggested that it was already 1.30 am. Let’s spend the night in the car. We were left with no options. We sat in the car and started chanting God’s name.

10 to 15 minutes passed and we saw a lantern moving in the distance. The lantern slowly started approaching our car.  I was afraid of who it might be. As the light got a little closer, I saw the figure of a man who approached the car and asked me to open the door. My sister-in-law said don’t open the door, we don’t know the person, he might be a thief also. But my brother opened the window. The man brought a lantern close to his face and questioned us.  The man looked like a sage. He was dressed in white Pancha and a towel over his shoulders, a large dot of Kumkum on his forehead his white long hair was bound in the bunch. He had a lantern in one hand and a can in the other.

My brother told him what had happened and asked him about the Guruji’s address. After hearing this, he said, ‘I think you are very hungry, I have Manjunath Swami’s prasad with me, please have it first. He offered Sugarcane juice from his can and said it was the Prasad offered to Lord Manjunath swami. We were in dilemma whether to have it from a stranger or not, what if he was a thief and trying to fool us? But my brother trusted him and drank 2-3 glasses of juice. He felt very good. Then we all had the prasad, it was really tasty and we felt satisfied.

Then my brother asked him for Guruji’s address, he laughed softly and said that Guruji’s house was only 100 meters away and he would guide us. We got out of the car and followed him with the luggage. In five minutes, we came to Guruji’s house.

Then the person knocked on the door and called Guruji’s name, In a few minutes we heard someone coming. He said, ‘It was too late, he had to leave now. We thanked him and he left. After some time Guruji opened the door. He inquired why it took so long for us to reach. He said he was waiting for us and our phone call. Then my brother told him all that happened.

Then Guruji asked us whether we would have something to eat. We said we had the prasad given by that person. Then Guruji asked us to take a rest as we had to wake up at 4.30 so that we could go to take a river bath. Then we all went to bed. We got up at 5:00 in the morning and went to take a river bath.

Bhetala Vitthal! Bhetala Vitthal! My Encounter With God On That Day

We left Guruji’s house at 6.25 pm to offer prayers to the shrine Manjunatha Swami. The car had stopped on the way and the driver went to bring the mechanic. We told Guruji that this is where we met the man. His room is here. But there was nothing there. There was only dense forest. Guruji said that you must have met him somewhere else as no one lives here, it is a forest area. We were amazed. We met them here last night and now we don’t see the house? Who was that person?

Later in the temple, Guruji also asked the rest of the Gurujis about the person we described. But they said never seen such a person. We wondered, what did all this mean? Who was that person? Questions were running through our heads.

Bhetala Vitthal! Bhetala Vitthal! My Encounter With God On That Day

Bhetala Vitthal! Bhetala Vitthal! My Encounter With God On That Day

Later, we went to the temple to have a darshan of Manjunatha Swami, and at the time of Darshan, I saw Lord Vitthal standing there instead of Lord Manjunath swami. I did not know if this was my illusion or reality. Vitthal had come to our aid on Ekadashi. I felt goosebumps, is it real that the person who offered Prasad to us when we were hungry and led us to Guruji’s house when we were lost is Lord Vitthala???

Still now, whenever I remember this incident, I feel the rush of emotions and can’t believe Lord Vitthal had come that day in the form of that person to show us the way.

If you have unwavering faith and bhakti in God, God will certainly come to your aid, not in direct form, but in indirect form.

Links to my other articles

Krishna Janmashtami

Significance f Akshaya Tritiya

Gudi padwa

Shri Ram Navami

Have you ever had such an experience like this? Please let me know in the comments.

भेटला विठ्ठल

भेटला विठ्ठल. खरंच. मला विठ्ठल भेटला. असा कुणाला विठ्ठल भेटतो का हो?

अगदी प्रत्यक्ष रूपात नसेल तरी, कुठल्याही रूपात ! विठ्ठल भेटतो नक्की

आषाढी एकादशी निमित्याने बरेच वर्षापूर्वी मला आलेला अनुभव मी या आर्टिकलमध्ये सांगणार आहे.

परिचय

माझे माहेर धारवाड आहे. तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होते. मला दोनतीन दिवस जोडून सुट्टी मिळाली होती. माझा भाऊ मला म्हणाला आपण कुठे तरी फिरून येऊया. मग आम्ही दोन दिवसांसाठी मी,भाऊ, वाहिनी आणि दोन लहान मुलं तीर्थयात्रेला जायचं म्हणून ठरवले. इडगुंजी, मुरुडेश्वर,गोकर्ण, उडुपी,धर्मास्थळ, होर्नाडू आणि शृंगेरी या सर्व ठिकाणी यात्रा करायचं म्हणून ठरवले.

माझ्या भावानी एक ओळखीची कार बुक केली. धर्मस्थळमध्ये दर्शन घ्यायला खूप वेळ लागते म्हणून भावाच्या मित्रांनी एका गुरूजींचा फोन नंबर दिला. आम्ही त्यांना फोन केला आणि रात्रीच्या मुक्कामासाठी त्यांच्या घरी येण्याबद्दल सांगितले. दुसर्‍या दिवशी दर्शन करायला जायचं होतं.

आम्ही सकाळी लवकर निघालो. इडगुंजी मध्ये  श्री गणपतीचे दर्शन घेऊन मुरुडेश्वरला गेलो तिकडे पण छान दर्शन झाल आणि प्रसादपण मिळाला. त्यानंतर गोकर्णाला गेलो आणि तिकडचे दर्शन करून उडुपीला आलो.

त्यावेळी संध्याकाळचे सात वाजले होते आणि त्या दिवशी एकादशी होती. आम्हाला याची कल्पना नव्हती. दर्शनासाठी खूप गर्दी होती. दर्शन करून बाहेर पडायला आम्हाला सव्वानऊ झाले होते. आम्हाला भूक पण लागली होती. त्यादिवशी एकादशी असल्यामुळे मंदिरामध्ये प्रसाद नव्हता.

धर्मस्थळाच्या वाटेवर

आमच्या ड्राइवर म्हणाला,धर्मस्थळ पोहोचायला उशीर होईल त्यामुळे धर्मस्थळ मध्येच तुम्ही जेवण करा आता लगेच निघूया. थोडाफार फळ वगैरे खाऊन आम्ही कारमध्ये बसलो, माझ्या दोन्ही भाची झोपी गेल्या होत्या. साधारण अर्धा तास झाला होता. जोरात पाऊस पडायला सुरु झाला. घाट सेक्शन असल्यामुळे ड्राइवर हळूहळू कार चालवत होता. असं करत करत धर्मस्थळ पोहचायला रात्रीचे 11 वाजले होते. तेथील मंदिराचा प्रसादाची वेळ पण संपली होती आणि एकही हॉटेल उघडे नव्हते. आम्हाला प्रश्न पडला आता काय करायचे म्हणून?

अज्ञात ठिकाणी अडकलो

गुरूजींचा घरी जाऊया म्हणून आम्ही निघालो त्या वेळी मोबाईलचा वापर एवढा नव्हता. गुरूजींच्या घरी लँडलाईन होता. पण पावसामुळे तो लागत नव्हता. असच आम्ही कुणालातरी विचारत विचारत एका ठिकाणी पोहोचलो. पूर्ण अंधार झाला होता, पुढें रस्ता कळेना. कुणाला विचारावं म्हटलं तर एकही माणूस दिसेना. माझा भाऊ म्हाणाला आता आपण धर्मस्थळ बस स्टँडला जाऊया, तिकडे लाईट पण असेल आणि दुकान किंवा हॉटेल पण उघडे असेल. काहीतरी खायला मिळेल.

पण आमची परीक्षा संपली नव्हती. नेमकी त्याचवेळी कार बंद पडली. काही केल्या सुरू होईना. तेवढय़ात मूली पण उठल्या आणि भुकेने रडायला लागल्या. सोबत ठेवलेलं सगळं खाऊ आणि पाणी संपल होत. कार पण सुरू होईना. कारची बॅटरी पण डिस्चार्ज झाली होती. अंधाराशिवाय काही दिसेना.

आम्ही सगळे खूप घाबरलो होतो.  ड्राईव्हर म्हणाला. आता दीड वाजायला आले. कारमध्येच बसूया. चार साडेचार वाजले की हळूहळू वर्दळ सुरू होईल तेव्हा बघू .आम्ही देवाचे नामस्मरण करत कारमध्येच बसलो होतो.

मदतीचा हात

10 ते 15 मिनिटे झाली होती. आम्हाला लांबून एक कंदील हलताना दिसला. कंदील हळूहळू आमच्या कारजवळ यायला लागला. कोण असेल म्हणून मला भीती वाटू लागली. थोडा जवळ आल्यावर एक माणसाची आकृती दिसायला लागली. तो माणूस कारजवळ आला आणि दार उघडायला सांगितलं. माझी वाहिनी म्हणाली कोण आहे, काय माहित? दार उघडू नका.

पण माझ्या भावाने खिडकी उघडली. तेव्हा त्या माणसाने स्वतःचे चेहरा जवळ कंदील आणून आमची विचारपूस केली.  तो माणूस एका ऋषीसारखा वाटत होता. अंबाडा बांधलेले पांढरे केस, कपाळावर मोठे कुंकू, पंचा आणि उपरणे नेसलेला असा होता. एका हातात कंदील आणि दुसर्‍या हातात एक कॅन होते. माझ्या भावानी सगळी हकीकत सांगितली. हे ऐकून घेतल्यावर ते म्हणाले, तुम्हाला खूप भूक लागली असेल माझ्याकडे मंजुनाथ स्वामीचा प्रसाद आहे. उसाचा रसाचा पानका म्हणतात. रस प्या तुम्हाला बरं वाटेल.

आमच्या मनात शंका आली. पण माझ्या भावानी. 2-3 ग्लास रस प्यायला. त्याला खूप बरं वाटलं. नंतर आम्ही पण सगळ्यांनी ते रस प्यायलो पोटात थंड वाटलं. नंतर माझ्या भावांनी त्यांना गुरूजींचा पत्ता विचारला,  ते हळूवार पणे हसले आणि म्हणाले फक्त 100 मीटरच्या अंतरावर त्यांच घर आहे. चला मी सोडतो तुम्हाला. आम्ही कार वरनं खाली उतरलो. लगेज घेऊन त्यांच्या मागे चाललो. पाच मिनिटात गुरूजींचे घरासमोर आलो. त्या व्यक्तीने गुरूजींचे नावाने हाक मारली. कुणीतरी येवू लागले असा आवाज झाला. तेव्हा ते म्हणाले, मला पण खूप उशीर झाला आहे मी आता निघतो. असं सांगून ते निघून गेले.

गुरूजींनी येऊन दार उघडले. त्यांनी विचारले एवढा वेळ का लागला? खूप वेळ वाट बघितली तुमची,  तुमचा फोन पण नाही आला. तेव्हा भवानी सांगितले आम्ही खूप वेळा ट्राय केला तुमचा फोन बंद  येत होता. तेव्हा ते म्हणाले हो पावसामुळे लाइन कट झाली असेल. चला तुम्ही खूप दमले असाल. काय खायला देऊ काय? आम्ही म्हणालो त्या व्यक्तीने आम्हाला प्रसाद दिला त्याने पोट भरले. नंतर सगळे झोपलो.

सकाळी 5:00 वाजता  लवकर उठून नदी स्नानासाठी जायचं होतं. नदी स्नान करायला गेलो. आम्ही धर्मस्थळ मंजुनाथ स्वामीच्या दर्शनासाठी 6.25 ला गुरूजींच्या घरातून निघालो. वाटेत कार थांबली होती. आम्ही गुरूजींना सांगितले की इथेच ती व्यक्ती भेटली होती. त्यांची खोली पण इकडेच आहे. पण तिकडे काहीच नव्हतं. पूर्ण जंगल होत, गुरुजी म्हणाले की तुम्हाला भास झाला असेल. इकडे कोणीही रहात नाही. आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. रात्री इकडे भेटलो होतो त्यांना आणि आता घर पण दिसेना? कोण होती ती व्यक्ती ?

नंतर मंदिरात गुरुजींनी बाकी गुरुजींना पण विचारले. आम्ही सांगितल्यासारखं दिसणारे व्यक्ती आहे का?  पण सर्वांनी अशी व्यक्ती बघितली नसल्याचे सांगितले.

भेटला विठ्ठल

bhetala vitthal! my encounter with God on that day
bhetala vitthal! my encounter with God on that day

हे सगळं काय होतं? कोण होती ती व्यक्ती? आमच्या डोक्यात प्रश्न पडत होते. नंतर मंजुनाथ स्वामीच्या दर्शनासाठी आम्ही मंदिरात गेलो. त्यावेळी मला शिवलिंगाऐवजी साक्षात विठ्ठल उभारल्यासारखा दिसला. हा माझा भ्रम होता की काय समजेना. साक्षात विठ्ठल एकादशी दिवशी आमच्या मदतीला धावून आले होते. अजूनही याघटनेची आठवण आलीकी अंगावर काटे येतात. आम्हाला मार्ग दाखवायला साक्षात विठ्ठल त्या दिवशी त्या व्यक्तीच्या रूपाने आले होते.

देवावर.अखंड श्रद्धा, विश्वास आणि भक्ति असेल तर देव तुमच्या मदतीसाठी नक्कीच धावून येतो. प्रत्यक्ष रूपात नसेल तरी अप्रत्यक्ष रूपात नक्की दर्शन देतो.

तुम्हाला असे अनुभव कधीतरी आले आहे का? कमेंट करून नक्की सागा.

धन्यवाद.

4 thoughts on “Bhetala Vitthal! Bhetala Vitthal! My Encounter With God On That Day”

Leave a Comment